Breaking News

खालापुरात आदिवासी दिन उत्साहात

खालापूर : प्रतिनिधी

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने श्रमजीवी संघटनेतर्फे सोमवारी (दि. 9) खालापूर शहरात पालखी काढून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी ढोलताशांच्या आवाजावर ठेका धरून आनंदोत्सव साजरा केला. श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी सोमवारी खालापूर फाटा ते तहसील कार्यालयापर्यंत पालखी मिरवणूक काढली होती. या वेळी आदिवासी बांधवांनी हुतात्म्यांना अभिवादन करून ढोलताशांच्या तालावर पारंपरिक नृत्ये सादर केली. श्रमजीवी संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षा योगिता दुर्गे, खालापूर तालुका अध्यक्ष हिरा पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून एकजूट राखण्याचे आवाहन केले. या वेळी खालापूर तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply