Breaking News

रोटरी क्लबच्या वतीने पूरग्रस्थ गावांना मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त

रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर, रोटरी क्लब ऑफ पेण, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन व रोटरी क्लब ऑफ खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने (सिनर्जी प्रोजेक्ट) महाड तालुक्यातील पूरग्रस्थ गावांना भेट देऊन, प्रत्यक्षात त्या गावांची पाहणी करून त्यांना त्याक्षणी मदत करण्यात आली.

चारही रोटरी क्लबने सुमारे 435 किट्स, ज्यामध्ये साडी, पेटीकोट, सॅनिटरी नेपकीन, सॅनिटाइजर, हॅण्डवॉश, फिनेल बॉटल्स यांचा समावेश होता. महाड-बिरवाडी भागातील खरवली, ढालकाठी, कोंडिवते, वडवली (बौद्धवाडी) येथील सुमारे 185 घरांना त्यांच्या गरजेनुसार या किटचे वितरण केले.

रोटरी पेणचे अध्यक्ष सचिन शिगवण, पनवेल रोटरी इंडस्ट्रीयल टाऊन अध्यक्ष गुरुदेव सिंग कोहली, पनवेल रोटरी महानगर अध्यक्ष रवींद्र नाईक, रोटरी खोपोली अध्यक्ष सुरेश खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व अ‍ॅसिस्टंट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. विष्णू म्हात्रे (पनवेल) यांच्या मार्गदर्शनाखाली हा सिनर्जी उपक्रम यशस्वीरीत्या झाला. या वेळी रो. विष्णू म्हात्रे, रवींद्र नाईक, सचिन शिगवण, अशोक जैन, विनोद गुरमे, मुकुंद चौधरी, पुरणसिंग मेहरा, मनोहर पाटील व प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply