Breaking News

वाशी गाव येथे पेटली नामकरणाची मशाल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी उभारलेल्या लढ्याच्या दुसर्‍या टप्प्यातील आंदोलनाची जनजागृती करण्यासाठी सोमवारी (दि. 9) ऑगस्ट क्रांतिदिनी सर्वपक्षीय कृती समिती अंकित नवी मुंबई महानगपालिका क्षेत्र समन्वय समितीच्या वतीने वाशी गाव येथे मशाल मार्चचे आयोजन करण्यात आले. 15 ऑगस्टपर्यंत सिडकोने आपला निर्णय बदलून दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याबाबत कार्यवाही सुरू केली नाही, तर 16 ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सिडको आणि राज्य सरकार यांच्याकडून कोणतीही हालचाल सुरू नसल्याने 16 ऑगस्ट रोजी काम बंद आंदोलनाची जनजागृती व नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त प्रेमनाथ पाटील चौक, वाशी गाव येथे मशाल मोर्चा काढून ‘दडपशाही चले जाव’चा नारा देत काम बंद आंदोलनाची जनजागृती करण्यात आली. या मोर्चात माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत व युवा नेते निशांत भगत यांच्यासह स्थानिक भूमिपुत्र व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply