Breaking News

पनवेल तालुक्यात विविध विकासकामे

वाकडी येथे काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत वाकडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. या रस्त्याचे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 10) उद्घाटन करण्यात आले.

पनवेल तालुक्यातील वाकडी ग्रामपंचायत हद्दीमधील हनुमान मंदिर ते दुंदरे रोड या रस्त्याची दूरवस्था झाली होती. त्याअंतर्गत या रस्त्याचे पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून काँक्रीटीकरण करण्यात आले. या रस्त्याचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी सरपंच संतोष पाटील, नामदेव जमदाडे, माजी सरपंच नरेश पाटील, बाळाराम उसाटकर, भगवान म्हात्रे, माजी सरपंच नारायण भगत, रमेश नावडेकर, रामदास म्हात्रे, दिनेश फडके, सचिन फडके, जनार्दन भगत, तुकाराम गायकर, रामदास फडके, बाळाराम पाटील, गणेश म्हात्रे, संजय पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोरबे येथे रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्यानुसार मोरबे येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधून रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत या विकासकामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 10) करण्यात आले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्याचा विकास होत आहे. त्यांच्या स्थानिक आमदार निधीमधून अनेक विकासाची कामे तालुक्यात सुरू आहेत. त्या अंतर्गत मोरबे येथील एकनाथ नावडेकर यांच्या घरापासून ते मराठी शाळेपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून करण्यात येणार आहे. या विकासकामाचे भूमिपूजन भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वाकडीच्या सरपंच कुंदा पवार, उपसरपंच अरुण पाटील, सदस्य मंगेश पाटील, नीता पाटील, नरेश पाटील, नामदेव जमदाडे, संतोष पाटील, मोरबे ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश नावडेकर, सदस्या सुवर्णा भगत, लता नाईक, माजी सदस्य नारायण भगत, ज्येष्ठ नेते रामदास म्हात्रे, निवृत्ती नावडेकर, सचिन फडके, बाळाराम उसाटकर, जनार्दन भगत आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply