Breaking News

पोलादपुरातील आपद्ग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

अनुज्ञा साथी फाऊंडेशनचे मदतकार्य

पोलादपूर : प्रतिनिधी

तालुक्यातील कुडपण बुद्रुक, कुडपण खुर्द, शेलारांचे कुडपण, तुटवली, धनगरवाडी, खरवली, तळीये या आपद्ग्रस्त गावांना अनुज्ञा साथी फाऊंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.

फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा कुलकर्णी, सचिव अनुराधा जाधव, खजिनदार मनिषा चव्हाण, अ‍ॅड. श्वेता लेवे, शुभांगी जाम्बरे, स्थानिक शिक्षक मारुती कळंबे, युवा कार्यकर्ते वैष्णवी मांडेकर, दिशा येरुणकर, प्रेरणा कुलकर्णी, प्रणव जाम्बरे यांनी किराणामाल, कपडे, ब्लँकेट, औषधे व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट्स बनवून त्यांचे आपद्ग्रस्त गावांतील 500 कुटुंबांना वाटप केले. फाऊंडेशनच्या या उपक्रमास मुंबईचे मदन शिंदे, राजेश चव्हाण, किरण कदम, जिग्नेश सिसोदिया, तसेच स्थानिक महिला कार्यकर्त्या वनिता मुंडकर, संगीता धुमाळे, जयश्री गुळवे यांनी विशेष सहकार्य केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply