Breaking News

उरणमध्ये पोलिसांकडून रूट मार्च

उरण : वार्ताहर

सध्या महाराष्ट्रात उद्भवलेल्या जातीय घटनांच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस परिस्थिती सांभाळण्यासाठी समर्थ असून सतर्क आहेत. जनतेमध्ये तसा संदेश देण्यासाठी मंगळवारी

(दि. 16) सायंकाळी 5 वाजता पोर्ट विभागातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

हा रूट मार्च उरण चार फाटा बस डेपो येथून सुरू करून ते राजपाल नाका, मस्जिद मोहल्ला, महात्मा गांधी पुतळा, वैष्णवी हॉटेल, एनएमएमटी बस स्टॉप येथे 5.50 वाजता रूट मार्चची सांगता करण्यात आली. या रूट मार्चमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग 2, पोलीस निरीक्षक, सात पोलीस अधिकारी आणि 38 महिला व पुरुष अंमलदार आदी उपस्थित होते.

नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नका, सर्वांनी शांतता राखावी, कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार करताना आढळल्यास त्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी सांगितले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply