Breaking News

भारत-इंग्लंड पुन्हा आमनेसामने

गुरुवारपासून दुसरी कसोटी

लंडन ः वृत्तसंस्था
इंग्लंड दौर्‍यावर गेलेला भारतीय संघ यजमानांसोबत गुरुवार (दि. 12)पासून सुरू होणार्‍या दुसर्‍या कसोटीत पुन्हा एकदा भिडेल. याआधी झालेल्या पहिल्या कसोटीत पावसामुळे भारताला विजयाने हुलकावणी दिली होती. आता दोन्ही संघांची नजर दुसर्‍या कसोटीत विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा असेल.
दरम्यान, दुसर्‍या कसोटी सामन्याच्या आधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो दुसर्‍या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही असे समजते. त्यामुळे आधीच खराब रेकॉर्ड असलेल्या लॉर्ड्स मैदानावर भारताला सेटबॅक बसला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार भारतीय संघातील शार्दुल ठाकूरला दुखापत झाल्याने संघात इशांत शर्माची निवड होऊ शकते. विराट कोहलीने मालिका सुरू होण्याआधी चार जलद गोलंदाज आणि एक फिरकीपटूसह खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे ठाकूरच्या जागी इशांतचा समावेश नक्की समजला जात आहे. शार्दुलने आतापर्यंत तीन कसोटीत 3.42च्या सरासरीने 11 विकेट घेतल्या आहेत.
भारतीय संघापाठोपाठ इंग्लंडलादेखील मोठा फटका बसला आहे. संघातील स्टार जलद गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला दुखापत झाल्याने तोही संघाबाहेर झालाय. ब्रॉडच्या पायाला दुखापत झाली असून ती गंभीर आहे त्यामुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर होऊ शकतो असे वृत्त आहे. त्याच्या जागी मार्क वूडला संधी मिळू शकते. ब्रॉडची ही 150वी कसोटी होती, पण आता त्यासाठी त्याला वाट पाहावी लागू शकते.
वुडने 20 कसोटीत 3.25च्या सरासरीने 59 विकेट घेतल्या आहेत, तर वन डेतदेखील त्याने 5.46च्या सरासरीने 69 विकेट मिळवल्या आहेत.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply