Wednesday , February 8 2023
Breaking News

तंदुरुस्त श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये खेळणार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारताचा कौशल्यवान फलंदाज श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) उर्वरित हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यासाठी तो उपलब्ध असेल.

मुंबईच्या 26 वर्षीय श्रेयसला मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. इंग्लंडमध्ये श्रेयसच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) श्रेयस तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाल्यावर त्याला आता स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे, पण श्रेयस परतल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद पुन्हा त्याच्याकडे सोपवण्यात येणार की यष्टीरक्षक ऋषभ पंतच नेतृत्वाची धुरा वाहणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीत आयपीएलच्या उर्वरित हंगामाला प्रारंभ होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगमधील फ्रेंचाइजी दिल्ली कॅपिटल्स संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरने आयपीएलच्या उर्वरित  14व्या हंगामात पुनरागमन करण्याची तयारी सुरू केली आहे. क्रिकेट मैदानावरील पुनरागमनासाठी श्रेयस तंदुरुस्तीवर मेहनत घेताना दिसून आला आहे. त्याचबरोबर त्याने प्रशिक्षणदेखील सुरू केले आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply