Breaking News

नीरजचा आणखी एक पराक्रम

जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी झेप

हरियाणा ः वृत्तसंस्था

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचणार्‍या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या नावे आणखी एका पराक्रमाची नोंद झाली आहे. सुवर्णपदक जिंकल्यामुळे नीरज चोप्राच्या गुणसंख्येत वाढ झाली असून जागतिक क्रमवारीत त्याने दुसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. नीरजची गुणसंख्या 1315 असून जर्मनीचा जोहान्स 1396 गुणांसहित पहिल्या क्रमांकावर आहे.

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकच्या फायलनमध्ये 87.58 मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. नीरजच्या सुवर्णपदकामुळे भारताने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भारताने एकूण सात पदके जिंकली. मायदेशी परतल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये यशस्वी कामगिरी करणार्‍या विजेत्यांचा क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि माजी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये ज्या मोजक्या भारतीय अ‍ॅथलिट्सकडून पदकाच्या अपेक्षा आहेत त्यात नीरज चोप्राचाही समावेश होता. सातत्यपूर्ण प्रदर्शनासह नीरजने सर्वांचे लक्ष वेधले होते.

याच वर्षी मार्चमध्ये झालेल्या इंडियन ग्रां प्री-3 स्पर्धेत नीरजने 88.07 मीटर भालाफेक करत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला होता. अंजू बॉबी जॉर्जनंतर कुठल्याही मोठ्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावणारा नीरज दुसरा भारतीय खेळाडू आहे.

रियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरण्यासाठी जो थ्रो नीरजला करायचा होता तो करायला उशीर झाल्याने नीरजची ती संधी हुकली. नीरजसाठी हा अत्यंत दुःखद अनुभव होता, मात्र टोकियो ऑलिम्पिकवेळी त्याने ही संधी गमावली नाही.

नीरज आता 23 वर्षांचा आहे आणि टोकियोनंतर त्याचे लक्ष 2024 साली होणार्‍या पॅरिस ऑलिम्पिकवरही आहे.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply