कर्जत : बातमीदार
तालुक्यातील नेरळ येथील हुतात्मा चौकात मध्यरात्री तिरंगा झेंडा फडकवून भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. वांगणी रेल्वे स्थानकात लहान मुलीचे प्राण वाचविणार्या मयूर शेळके यांच्या हस्ते मध्यरात्री 12 वाजून एक मिनिटांनी भारताचा झेंडा फडकवला जाणार आहे. नेरळच्या हुतात्मा चौकात गेली 16 वर्षे मध्यरात्री स्वतंत्रता दिन साजरा केला जातो.
नेरळमधील अॅड. गजानन डुकरे यांनी सायकलिंग स्पर्धेत विक्रम केला आहे आणि देवराज डुकरे या आठ वर्षीय बालकाने दोन क्रीडा प्रकारात विक्रम करून आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. त्याबद्दल त्यांचा या वेळी हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार केला जाणार आहे. कार्यक्रमाला नेरळमधील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी केले आहे.
कर्जत : प्रतिनिधी
प्रेस क्लब आणि कर्जत तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नगर परिषद कार्यालयासमोरील स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब राऊत चौकात शनिवारी (दि.14) मध्यरात्री 12 वाजून 05 मिनिटांनी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी कोविडविषयक सर्व नियम पाळून या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष राहुल देशमुख यांनी केले आहे.