Breaking News

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्ष लागवड

उरण : वार्ताहर

निसर्गमित्र राजू मुंबईकर यांनी  वसुंधरा दिवसाचे औचित्त साधून  उरण तालुक्यातील वेश्वी येथील एकविरा देवी मंदिर डोंगर माथ्यावरील माळरानावर गेल्यावर्षी लागवड केलेल्या वटवृक्षांच्या सभोवताली कुंपण करून त्याला मातीचा भराव केला. या मुळे त्या वटवृक्षाच्यां झाडांना मजबुती मिळेल आणि अजून जोमाने वाढ होण्यास मदत मिळेल.

मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणातुन झालेला पर्यावरणाचा र्‍हास आणि त्यामुळे अचानक वातावरणात होणारे  बदल, कधी अवकाळी पडणारा पाऊस तर कधी  ढगफुटीमुळे उद्भवणारी महाभयंकर पूरस्थिती, चक्रीवादळं, अतिउष्णतेमुळे होणारे ग्लोबलवार्मिंग त्यातून सार्‍या जगाला भोगावे लागणारे महाभयंकर दूरगामी परिणाम ह्यातून मानवाने काहीतरी बोध घेऊन  निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे आणि म्हणूनच या निसर्गाच्यां संवर्धनाप्रति जागरूक असणारी काही मंडळी सतत आपल्या माध्यमातून निसर्गसंवर्धनाच्या कार्यात मशगुल असतात. याचाच एक प्रत्यय उरण तालुक्यात  आला. काही दिवसांपूर्वी  वेश्वी येथील एकविरा देवी मंदिर डोंगर पायथ्याशी असणार्या रॉक ऍनिमल पार्कमध्ये राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून आणखी तीन हत्ती, सिंह, गरुड या प्राणी- पक्षांचे  फायबरचे स्टेचू बसविण्यात आले. त्याच रॉक ऍनिमल पार्कमध्ये तब्बल दहा बारा फुटांच्या वटवृक्षांच्या सहा झाडांची लागवड करण्यात आली. या अगोदर वड,पिंपळ,कडूलिंब,करंज जातीच्या अनेक झाडांची लागवड करून त्या झाडांची देखभाल आणि  जोपासना करून तिथल निसर्ग सौंदर्य खुलवलं गेलं आहे ते केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर आणि त्यांच्या सर्व सहकारी मंडळींनी आणि खर्‍या अर्थाने निसर्ग संवर्धन आणि संरक्षणाच्या कार्यात एक नवा आदर्श निर्माण करून पर्यावरणाच्या संतुलनासाठी आणि या वसुंधरेला हिरवा शालू पांघरण्यासाठी अनेक वृक्षांची लागवड करून निसर्गसंवर्धनासाठी आपलं अनमोल योगदान दिलं.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply