Breaking News

कर्नाळा बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द

पनवेल : रामप्रहर वृत्त

कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या 529 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कर्नाळा बँकेचा परवाना अखेर रद्द केला आहे. गुंतवणूकदारांना 95 टक्के रक्कम परत मिळणार आहे, असे आश्वासन आरबीआयने दिले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरबीआय आणि केंद्रीय पातळीवरील उच्च अधिकार्‍यांकडे केला होता.

या प्रकरणी कर्नाळा बँकेचे विद्यमान अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ‘ईडी’ने अटक केली असून ते सध्या तळोजा जेलमध्ये आहेत. या घोटाळ्याला विवेक पाटील यांच्यासह शेकापचे संचालक मंडळातील काही सहकारी जबाबदार असल्याचे सहकार खात्याने यापूर्वीच जाहीर केले आहे. दरम्यान, दीड वर्षांपूर्वी या दोषी 17 संचालकांवर एफआयआर दाखल झाला होता. तरीदेखील त्यांना अटक करण्यात आली नव्हती. याबाबत भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी ईडीकडे लेखी तक्रार केली होती.

कर्नाळा बँकेच्या 529 कोटींच्या घोटाळ्यामुळे अनेक बँकेचे खातेदार अडचणीत आले आहेत. त्यांचे पैसे बँकेत अडकले आहेत. तर काहींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 50 हजार 689 ठेवीदारांच्या 529 कोटीच्या ठेवी बँकेत होत्या, असा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. तर आता आरबीआयने केलेल्या कारवाईमुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply