आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप वैद्यकीय सेलच्या वतीने देशभरात ‘राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान कार्यशाळा’ 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान आयोजीथ करण्यात येत आहे. त्याअंतर्गत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजप उत्तर रायगडच्या वतीने या कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यशाळेतील सर्व माहिती बूथ आणि शक्ती केंद्र स्तरापर्यंत पोहचविण्याचे आवाहन उपस्थित पदाधिकार्यांना केले.
भाजप वैद्यकीय सेल उत्तर रायगडच्या वतीने पनवेल शहराती मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत स्वास्थ स्वयंशेवक संकल्पना, कोरोना प्राथमिक माहिती, कोविड प्रतिबंधात्मक माहिती, कोविड प्राथमिक उपचार व रोगप्रतिराक शक्ती वाढविण्याचे उपाय, सुर्यनमस्कार व योगासने तसेच कोविड पूर्व लाटेची तयारी या विषयांवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या वेळी भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, वैद्यकीय सेल जिल्हा संयोजक डॉ. बबन नागरगोजे, स्वस्थ अभियान जिल्हा संयोजक डॉ. अरुणकुमार भगत, वैद्यकीय सेलचे जिल्हा सहसंयोजक डॉ. अनिल पराडकर, डॉ. कृष्णा देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर हे मार्गदर्शन करता म्हणाले की, आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. आपल्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत. आपण समाजाला सहकार्य करण्यासाठी आहोत.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला समाजामध्ये मदतीचे काम करायचे आहे. तसेच या कार्यशाळेत कोरोनाची प्राथमिक माहिती काय आहे. रोगप्रतिकारशक्ती कशा प्रकारे वाढवू शकतो, पुर्व लाटेची तयारी सज्जता कशी करू शकतो या सगळ्या गोष्टींची उजळणी या कार्यशाळेत होणार आहे. त्यामुळे कार्यशाळेत जे समझून घेतले ते आपण स्वत: व्यक्ता म्हणून आपल्या सर्व बूथ स्थरापर्यंत, शक्ती केंद्र स्तरापर्यंत पोहचवायचे आहे.