Tuesday , February 7 2023

विजयी विश्व तिरंगा प्यारा

नेरळमध्ये मध्यरात्री ध्वजारोहण

कर्जत : बातमीदार

हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने नेरळमधील हुतात्मा चौकात मध्यरात्री 12 वाजून एक मिनिटांनी शूरवीर मयूर शेळके यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कर्तव्य बजावावे, असे आवाहन मयूर शेळके यांनी या वेळी केले.

त्याआधी सरपंच उषा पारधी आणि मयूर शेळके यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. नेरळ  तरुणांनी गावातून मशाल फेरी फिरवून पुन्हा हुतात्मा चौकात आणली. त्यानंतर 12 वाजून एक मिनिटांनी मयूर शेळके यांनी तिरंगा झेंडा फडकवल्यानंतर सामुदायिक राष्ट्रगीत आणि ध्वजगीत झाले. तर मेघराज श्रीकृष्ण डुकरे या 7 वर्षीय चिमुरड्याने हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जीवनावर भाषण केले. हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने मयूर शेळके, दोन क्रीडा प्रकारात विक्रम करून आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळविणारा आठ वर्षीय देवराज डुकरे आणि सायकलिंगमध्ये आंतरराष्ट्रीय विक्रम करणारे अ‍ॅड. गजानन डुकरे यांचा सन्मान करण्यात आला.

 भाजपचे कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत, नेरळचे माजी उपसरपंच अंकुश शेळके, ग्रामपंचायत सदस्य दिलीप शेळके, चिंचवलीचे माजी उपसरपंच हृषीकेश भगत, वैभव भगत, बंडू क्षीरसागर, डॉ. हेमंत शेवाळे, अ‍ॅड. अशोक डुकरे, नरेश अहिर, शिवाजी टोकरे, हृषीकेश कांबळे, जैतु पारधी, गणेश पारधी, पप्पू कटारिया, पंढरी हजारे, गोरख शेप यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेकडो तरुण या वेळी उपस्थित होते.

हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे, रायगड प्रेस क्लबचे माजी संघटक संजय मोहिते, खजिनदार दर्वेश पालकर, समिती सदस्य जयवंत हाबळे, गणेश पवार, अजय गायकवाड, मल्हार पवार, सुमित क्षीरसागर, नितीन पारधी आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply