मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा पाठ सोडण्याचे नाव घेत नाहीये. एकनाथ खडसेंच्या मुलीनंतर आता त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडीने समन्स पाठवले आहेत. त्यानुसार त्यांना बुधवारी (दि. 18) ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणात हे समन्स बजावले गेले आहे. त्यामुळे या चौकशीदरम्यान काय होणार याकडे सर्वांचच लक्ष लागलेले आहे.
याआधी एकनाथ खडसे यांची जुलै महिन्यात 8 तारखेला ईडीने 9 तास केली होती. खडसेंचे जावई गिरीश चौधरींना अटक करण्यात आली. या अटकेनंतर खडसेंची ही चौकशी केली गेली होती. यावेळेस मंदाकिनी खडसेंनाही समन्स बजावलेले. समन्सनुसार त्यांना चौकशीसाठी ईडीसमोर उपस्थित राहायचं होते, पण मंदाकिनी खडसेंनी ईडीकडे काही दिवसांची मुदत मागितली होती.