Breaking News

खालापूर दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज ठप्प; इंटरनेट नसल्याचा बहाणा

खालापूर : प्रतिनिधी

तालुक्यात सध्या जमीन आणि सदनिका खरेदी विक्रीचे व्यवहार तेजीत आहेत, मात्र इंटरनेट सेवा नसल्याकारणाने खालापूर दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज गेल्या  आठ दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाले आहे. सदनिका, जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहाराची नोंदणी बंद असल्याने नागरिक व सदनिकाधारकांना मोठ्या समस्यांना व अडचणींना सामोरे जावे लागत आहे, तसेच शासनाचा महसूलही बुडत आहे. खालापूरात गेल्या 12 वर्षापासून दुय्यम निबंधक  कार्यालाय सुरू आहे. खालापूर ते खोपोली दरम्यान मुंबई-पुणे महामार्ग दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करताना प्रथम जांबरून फाटा आणि नंतर काही दिवसांनी हॉटेल भाग्यश्रीसमोर भारतीय दूरसंचार निगम (बीएसएनएल) ची केबल तुटली. त्यामुळे खालापूर तालुक्यातील शासकीय कार्यालयातील इंटरनेट सेवा बंद झाली आहे. इंटरनेट सेवा बंद असल्याने खालापूर दुय्यम निबंधक कार्यालयातील खरेदी-विक्री व्यवहारांच्या नोंदणीचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे शासनाचे उत्पन्न बुडत असून, खरेदी-विक्री करणार्‍या नागरिकांनादेखील मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामात दोन ठिकाणी बीएसएनएलची केबल तुटली. त्यामुळे इंटरनेट सेवा खंडित झाल्याने कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे. याबाबत बीएसएनएलला कळविले असून सेवा सुरळीत करण्याची विनंती केली आहे. खालापूर कार्यालयाची सेवा बंद असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनाही लेखी स्वरूपात कळविले आहे.

-स्मिता पवार, दुय्यम निबंधक, खालापूर

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply