Breaking News

अलिबागमध्ये ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान

अलिबाग : प्रतिनिधी

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त आलिबाग फोटोग्राफर्स अ‍ॅण्ड व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने गुरुवारी (दि. 19) येथील ज्येष्ठ छायाचित्रकार वामन पाटील आणि नितीन पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

अलिबाग असोसिएशनच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, वह्या वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मार्गदर्शन शिबिर असे विविध कार्यक्रम घेऊन जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो. या वर्षी असोसिएशनच्या वतीने अलिबागमधील ज्येष्ठ छायाचित्रकार वामन पाटील आणि नितीन पाटील यांचा सन्मार करण्यात आला. या वेळी असोसिएशनचे जिल्हा खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग अध्यक्ष समीर मालोदे, उपाध्यक्ष तुषार थळे, सचिव अमोल नाईक, कार्याध्यक्ष सधिन म्हात्रे, खजिनदार राकेश दर्पे, सल्लागार सुरेश खडपे, विवेक पाटील, दादा नाईक, गणेश जाधव उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply