Breaking News

शेकाप ग्रामपंचायत सदस्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षाच्या खैरवाडी ग्रामपंचायतीमधील विद्यमान सदस्य करुणा पांडुरंग भगत आणि शेकाप कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 21) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पक्षाची शाल देऊन प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी सरपंच नामदेव जमदाडे, जनार्दन कोळंबकर, खैरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रजनी डुमणे, उपसरपंच हनुमंत खैर, सदस्य भाग्यश्री कोळंबेकर, मंदाबाई वारगडा, लक्ष्मण शीद, सदस्य जनार्दन भगत, बळीराम भोईर, सचिन फडके, गणेश शिंदे, रामदास शिंदे, मंगळ्या खंडवी, अनंता पाटील, पिंटू म्हात्रे आदी उपस्थित होते.
भाजपच्या माध्यमातून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात पनवेल तालुक्यात विकासाची अनेक कामे सातत्याने होत असतात. ही विकासकामे आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकापच्या खैरवाडी ग्रामपंचायतीमधील विद्यमान सदस्य करुणा पांडुरंग भगत आणि शेकाप कार्यकर्ते श्रावण भगत, कानु सफरे, हिरा गडखळ, आंबो भगत यांनी ‘कमळ’ हाती घेतले. सर्वांचे स्वागत करण्यात आले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply