Breaking News

खासदार श्रीरंग बारणेंनी साधला नागरिकांशी संवाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी (दि. 19) खारघरमधील विविध सोसायट्यांमध्ये जाऊन रहिवाशांसोबत, तसेच समाजाच्या विविध स्तरांतील नागरिकांशी संवाद साधला.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचे वारे पनवेल मतदारसंघात जोराने वाहत आहेत. याच अनुषंगाने खारघरमध्ये खासदार बारणे आणि सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खारघरमधील कमिला असोसिएशन, उडिया समाज, बंगाली समाज, हावरे स्पेंल्डर सोसायटी आणि माजी सैनिक यांच्याशी संवाद साधण्यात आला.

विविध ठिकाणी झालेल्या या बैठकांना आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष, नगरसेवक जगदीश गायकवाड, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, नगरसेवक प्रवीण पाटील, रामजी बेरा, अजय बहिरा, नीलेश बावीस्कर, नरेश ठाकूर नगरसेविका हर्षदा उपाध्याय, नेत्रा पाटील, शिवसेनेचे महानगर प्रमुख रामदास शेवाळे, भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला मोर्चाच्या गीता चौधरी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सोसायट्यांतील रहिवासी, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाच्या सक्षम नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे गरजेचे आहे. त्यांना साथ देऊ या, असे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले; तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वांगीण विकासासाठी खासदार बारणेंना मत देऊन विजयी करा, असे आवाहन केले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply