Breaking News

मुसळधार पावसात आदिवासी बांधवाचे घर कोसळले

सारडे बेलवाडी येथील घटना

उरण : प्रतिनिधी

मुसळधार पडणार्‍या पावसात उरण तालुक्यातील सारडे बेलवाडी येथील एका आदिवासी बांधवाचे घर कोलमडून पडले. सुदैवाने घरात कोणीच नसल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, सामाजिक संघटनांनी पुन्हा नव्याने घर बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे चंदा नारायण वाघमारे यांचे राहते घर (झोपडी) कोलमडून पडले. सुदैवाने घरातील दोन्ही माणसे मच्छी पकडण्यासाठी खाडीत गेली असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घर कोसळताना मोठा आवाज झाल्याने बाजूच्या घरात राहणारे आदिवासी बांधव धावले. चंदा आणि तिचा पती घरी आल्यावर त्यांनी टाहो फोडला, पण हिंमत न हरता पुन्हा नव्याने घर बांधायचा निर्धार केला.

तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी तलाठ्याला आणि गटविकास अधिकारी नीलम गाडे यांना आदेश देऊन ग्रामसेवकाकडून तातडीने पंचनामा करून शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहेत, तर दरम्यान, हा मेसेज सर्व ग्रुपवर पोहचल्याने सगळीकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply