रसायनी : रामप्रहर वृत्त
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पाच वर्षांमध्ये केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहचवून श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा विजयी करण्याचे आवाहन विभागप्रमुख अजित सावंत यांनी मतदारांना केले.
श्रीरंग बारणे यांनी रसायनी येथील एचओसी या कंपनीतील कामगारांच्या वेतनासाठी 93 कोटी रुपयांची मंजुरी मिळवून दिली असल्याचे सावंत यांनी सांगितले. रसायनीतील बारणे समर्थकांनी प्रचारासाठी वासांबे मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली असून, प्रचारात
मिळणारा मतदारांचा मोठा प्रतिसाद कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणारा आहे. विकासकामांसाठी मतदार श्रीरंग बारणेंनाच विजयाचा कौल देतील, असा विश्वास विभागप्रमुख अजित सावंत यांनी व्यक्त केला. जनता सुज्ञ असून त्यांना विकासकामे करणारा लोकप्रतिनिधी हवाय. त्यामुळे विकासकामांच्या जोरावर बारणे पुन्हा लोकसभेत प्रवेश करतील, असा दावा अजित सावंत यांनी केला आहे.