Breaking News

विदेशी सिगरेटस्चा कोट्यवधींचा साठा जप्त

पनवेलमध्ये दोन जणांना अटक

उरण : प्रतिनिधी
दुबईहुन जेएनपीटी बंदरामार्गे आलेला 11 कोटी 88 लाख 28 हजार 800 रुपये किमतीचा विदेशी सिगरेटचा साठा महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकार्‍यांनी जप्त केला आहे. पनवेल तालुक्यातील सोमाटणे येथील नवकार कंटेनर गोदामात ही कारवाई करण्यात आली.
दुबईहुन आलेल्या 49 फूट लांबीच्या कंटेनरमध्ये खजुराच्या बॉक्समध्ये विदेशी सिगरेटचा साठा बेकायदेशीररित्या लपविण्यात आला होता. याची खबर डीआरआय विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून 600 मास्टर बॉक्समध्ये लपविण्यात आलेली 32 हजार 640 कार्टूनमधील 71 लाख 61 हजार 600 महागडी विदेशी सिगारेटची पाकिटे जप्त केली आहेत.
या प्रकरणी मनीष शर्मा (वय 31) आणि सुनील वाघमारे (29, दोघेही रा. चेंबूर, मुंबई) या दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील शर्मा हा वाघमारे याच्याकडून विजेचे बिल, पॅनकार्ड आदी कागदपत्रे घेऊन त्याच्या साहाय्याने बनावट कंपन्यांसाठी जीएसटी व आयात-निर्यात क्रमांक मिळवून देत असल्याचे निदर्शनास आले आहे.
 25 जूनपर्यंत कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply