Breaking News

हायमास्ट लाईट बसविण्याची मागणी

कळंबोली भाजपतर्फे सिडकोला निवेदन

कळंबोली : रामप्रहर वृत्त

कळंबोली-कामोठे जोड रस्ता व कळंबोलीतील सिंग सिटी हॉस्पिटल येथे हायमास्ट लाईट बसविण्यात यावे, अशी मागणी भाजप शहर चिटणीस संतोष गायकवाड यांनी सिडकोकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी बेलापूर येथील सिडको भवनच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. या वेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

गायकवाड यांनी निवेदनात म्हटले की, मुंबई – पुणे एक्सप्रेस रोडवर कळंबोली – कामोठे येथे जोड रस्ता नुकताच सुरू झाला आहे. तेथे मानसरोवर स्टेशन व गावावरून येण्याजाण्यासाठी बसस्टॉप आहे, परंतु तेथील परिसर हा पुर्ण अंधारमय आहे. त्यामुळे महिला व वयस्कर लोकांना रात्रीच्या वेळेस येण्या-जाण्यासाठी अतिशय बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. आपण कळंबोली-कामोठे जोड रस्त्याजवळ लवकरात लवकर मोठे हायमास्ट बसवावे. तसेच कळंबोलीतील सिंग सिटी हॉस्पिटलजवळदेखील हायमास्ट लाईट लावण्यात याव्या.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply