Monday , January 30 2023
Breaking News

रस्ते डागडुजीच्या कामास सुरुवात

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक 18मध्ये बर्‍याच ठिकाणी रस्त्यावरील ड्रेनेज झाकणांच्या बाजूला असलेल्या सिमेंट मटेरियल वाहून गेल्यामुळे खड्डे पडले होते. काही ठिकाणी रस्ता ही खराब झाला होता. खड्ड्यांमुळे रहदारीलादेखील अडथळा होत होता. पावसाने उसंत घेतल्यामुळे हे सर्व खड्डे बुजवण्याच्या व डागडुजीच्या कामाला नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने सुरुवात झाली आहे.

पहिल्या टप्प्यात प्रभागातील रिलायन्स फ्रेश चौक, ठाणा नाका रोड, चिंतामणी हॉल समोरील रस्ता, सहस्त्रबुद्धे हिस्पिटल चौक, वाल्मिकी नगर, परदेशी आळी ते सावरकर चौक, या ठिकाणी असलेले खड्डे बुजवण्यात आले. नगरसेवक विक्रांत पाटील तत्परतेने प्रभागातील समस्या सोडवतात त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply