Breaking News

स्नेहदिप फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : प्रतिनिधी

स्नेहदिप फाऊंडेशन आणि अंजुमन नजमी दाऊदी बोहरा जमात पनवेलतर्फे रविवारी (दि. 29) बोहरी समाजाच्या हॉलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शिबिराला भेट दिली. या वेळी ते म्हणाले की, रक्तदान हे पवित्र दान आहे. त्याबाबत दाऊदी बोहरा समाजात व विशेषत: महिलांमध्ये जागृती होत आहे. हे सुदृढ समाजाचे लक्षण आहे.

स्नेहदिप फाऊंडेशनचे संस्थापक आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनचे अध्यक्ष ऋग्वेद कांडपिळे यांनी कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊन कोणाला आपला प्राण गमवावा लागू नये यासाठी रक्तदानाची आठ शिबिरे घेण्याचे ठरवले आहे. पहिले शिबिर नवीन पनवेलमध्ये घेण्यात आले. या वेळी 59 बाटल्या रक्त जमा झाले. त्यावेळी ऋग्वेद कांडपिळे यांना दाऊदी बोहरी समाजातील अनेकांना रक्त दान करण्याची इच्छा असल्याचे समजले. त्यांच्या सोयीसाठी ऋग्वेद कांडपिळे यांनी रविवारी दुसरे शिबिर जे. जे. हॉस्पिटलच्या सहकार्याने अंजुमन नजमी दाऊद बोहरा जमात पनवेल व उमूर सेहतच्या संयुक्त विद्यमाने पनवेलच्या बोहरी समाजाच्या हॉल मध्ये घेतले.

या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बोहरी समाजातील महिलांनी ही प्रथमच मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रक्तदान केले. या शिबिरात 46 बाटल्या रक्त जमा झाले. शिबिराला सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेवक मनोज भुजबळ, अंजुमन नजमी दाऊदी बोहरा जमात पनवेलचे सैदना अली कादिर मुफ्फदल सैफूद्दीन व उमूर सेहतचे  सैफूद्दीन भरमल यांनी भेट दिली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply