Tuesday , February 7 2023

भाजपची डोंबिवलीत प्रतिकात्मक दहीहंडी

डोंबिवली ः प्रतिनिधी

कोरोनाचे कारण देत राज्य सरकारने दहीहंडीचा उत्सव साजरा करू नये, असे निर्बंध लादले होते. त्यावरून ठाकरे सरकारविरोधात इतर राजकीय पक्ष असा सामना सुरू झाला. अशातच डोंबिवलीत माजी मंत्री आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि. 31) डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात कार्यकर्त्यांसोबत प्रतिकात्मक दहीहंडी साजरी केली. राज्य सरकारने फक्त हिंदू सणांवर बंदी घातली. सरकारने कितीही बंधने आणली तरी भाजप हिंदू सण साजरे करण्यासाठी आग्रही राहणार असल्याचे या वेळी आमदार चव्हाण यांनी सांगितले.दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईतील काळाचौकी परिसरात कार्यकर्त्यांसोबत दहीहंडी फोडली. या वेळी नांदगावकर आणि पोलीस आमने-सामने आले होते. दहीहंडी फोडल्यानंतर पोलिसांनी नांदगावकर आणि इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Check Also

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस …

Leave a Reply