Breaking News

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पेण फोटोग्राफर्स अव्वल

रेवदंडा ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा फोटोग्राफर्स व व्हिडीओग्राफर्स असोसिएशनद्वारा रेवदंडा हरेश्वर मैदान येथे बुधवारी (दि. 22) आयोजित मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पेण फोटोग्राफर्स संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. द्वितीय खोपोली फोटोग्राफर्स, तृतीय पोयनाड फोटोग्राफर्स आणि चतुर्थ क्रमांक अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनने मिळविला.
स्पर्धेत अष्टपैलू खेळ करून दाखवत पेण संघाच्या शैलेश पाटीलने मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाजाचे पारितोषिक पटकावले. एका षटकात सलग तीन फलंदाज बाद करणार्‍या पोयनाड संघाच्या राजेंद्र पाटीलला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले.
सामन्याचे उद्घाटन मुंबई येथील राहुल सेल्सचे मालक हरिशभाई शहा यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कांबळे, रेवदंडा ग्रामपंचायत सदस्य संदीप खोत, संतोष पाटील (दर्यासागर), जितू शिगवण, अतुल वर्तक, निलेश खोत उपस्थित होते.
    स्पर्धेत रायगड जिल्हातील अलिबाग, पेण, खोपोली, कर्जत, रोहे, पाली, नागोठणे, पोयनाड संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्यांना रायगड फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष विवेक सुभेकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष योगेश राऊत, सचिव समीर भायदे, खजिनदार जितेंद्र मेहता, सदस्य समीर मालोंदे, क्रिकेट कमिटी सदस्य सुदेश माळी, संतोष देशमुख, भगवान जाधव, चैतन्य पाटील, राजा पेंटर, प्रणेश म्हात्रे, अमित पिसाट आदी उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply