Breaking News

आंतरराज्य टोळीतील म्होरक्या गजाआड

फरार आरोपी शोधपथकाची कामगिरी

खोपोली : प्रतिनिधी

आंतरराज्य टोळीचा म्होरक्या अनिल श्यामवेल गायकवाड (वय 55, रा. गोवा गल्ली, तेलगु कॉलनी, विजयनगर निवास चाळ, संभाजीनगर दौंड, ता. दौंड, जि. पुणे) याला नुकतेच राहत्या घरातून उचलून जेरबंद करण्याची मोठी कामगिरी फरार आरोपी शोधपथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग, पोलीस शिपाई दीपक जाधव, किरण देवकते, अक्षय पाटील आणि तुषार घरत यांनी केली. फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थापन केलेल्या या पथकाने आतापर्यंत मोठी कामगिरी करत जवळपास 40 आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. जेरबंद करण्यात आलेला अनिल हा अट्टल गुन्हेगार असून आंतरराज्य स्तरावर चोरी व फसवणुकीचे गुन्हे करीत होता. त्याच्यावर ठाणे शहर, पुणे शहर, बंगलोर, कर्नाटक येथे एकूण 23 गुन्हे दाखल आहेत.

रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली फरारी आरोपी शोधपथकाची नेमणूक करण्यात आली होती. या पथकाचे प्रमुख अमोल वळसंग यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. आरोपी अनिल गायकवाड हा खोपोलीत गुन्हा घडल्यापासून फरारी झाला होता. तो सध्या त्याच्या दौंड-पुणे येथील घरी राहण्यास आला आहे. त्याप्रमाणे तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्याच्या ठावठिकाणाबाबत माहिती प्राप्त करून फरारी पथक दौंड येथे रवाना झाले. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे व त्यांचे कर्मचारी यांच्या मदतीने आरोपी  अनिल गायकवाड याला अत्यंत शिताफीने पकडले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply