Breaking News

चित्रपटातून प्रेरणा घेऊन कचर्यापासून कंपोस्ट खतनिर्मितीचा ध्यास

औरंगाबाद ः प्रतिनिधी : घरात गोळा होणार्‍या कचर्‍याचे काय करायचे, हा प्रश्न गृहिणींना रोजच पडतो. मग हा कचरा एकतर रस्त्यावर किंवा उकिरड्यावर नेऊन टाकला जातो, नाहीतर ओला-सुका असे त्याचे वर्गीकरण करून कचरापेट्यांमध्ये त्या टाकतात, मात्र या कचर्‍यापासून कंपोस्ट खत तयार करू शकतो, हा विचारच डोक्यात येत नाही, पण गेल्या पाच वर्षांपासून कॅ नॉट परिसरातील एक जागरूक नागरिक स्वाती स्मार्त या घरच्या घरी कंपोस्ट खतनिर्मिती करतात. ‘आपला कचरा, आपली जबाबदारी’ या एकाच ध्यासाने त्या कार्यरत आहेत.

 पाच वर्षांपूर्वी स्वाती स्मार्त यांनी ‘वसुंधरा फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दाखविण्यात आलेल्या चित्रपटांमधून कचर्‍याचे योग्य संकलन करून त्यापासून खतनिर्मितीचे वेगवेगळे प्रयोग पाहिले. यापासून प्रेरणा घेत त्यांनी घरच्या घरी ओला कचरा एकत्र करून खतनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली. ‘स्मार्ट कम्पोस्टिंग ड्रम’च्या माध्यमातून त्या घरच्या घरी खत बनवतात. कंपोस्ट खतनिर्मितीबाबत त्या कन्नड, बीड, औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील

महिलांशी संवाद साधत जागरूकता करतात. त्यांनी आतापर्यंत 100पेक्षा अधिक प्रशिक्षण शिबिरे घेतली आहेत. स्वाती स्मार्त म्हणाल्या की, अनेक नागरिकांची तक्रार असते की आम्हाला खतनिर्मितीची आवड तर आहे; पण आमच्याकडे जागाच नाही. अशा नागरिकांसाठी एक उत्तम पर्याय म्हणजे तुम्ही ड्रम, पाण्याची बादली, जुने माठ यांच्यामध्येही ही खतनिर्मितीची प्रक्रिया करू शकता. या प्रकल्पाला जास्त जागाही लागत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्येही हा प्रकल्प करू शकता, जेणेकरून हवाही खेळती राहील आणि वासही येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply