Breaking News

छत्तीसगडमधील चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा; शस्त्रसाठा जप्त

बिजापूर ः प्रतिनिधी : छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी (दि. 21) चकमक झाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील पामेड परिसरात ही चकमक सुरू झाली. नक्षलविरोधी विशेष पथक (ग्रेहाऊंड फोर्स) आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी विशेष पथक आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. बिजापूर येथे सकाळी सर्च ऑपरेशन सुरू असताना जंगलात लपून बसलेल्या काही नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या पोलिसांनीही गोळीबार केला. चकमकीदरम्यान

दोन जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. नक्षलवाद्यांकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. छत्तीसगडच्या कुआकोंडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्‍या धनिकरका वनक्षेत्रात गुरुवारी (दि. 18) चकमक झाली होती. यामध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता, तर चकमकीदरम्यान एक नक्षलवादी गंभीर जखमी झाला होता. दोन जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले असून त्यामध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर वर्गीसचा समावेश होता. वर्गीसवर पाच लाखांचे बक्षीस होते.

सुकमामधील बिमापूरममध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये 26 मार्चला चकमक झाली होती. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडा येथे नक्षलवादी आणि कमांडो बटालियनदरम्यान चकमक झाली होती. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. बिमापूरमपासून एक किलोमीटरच्या अंतरावर ही चकमक झाली.

Check Also

रायगड क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी मदत करणार -आशिष शेलार

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)ला सर्वतोपरी मदत करणार, असे आश्वासन भारतीय क्रिकेट …

Leave a Reply