Breaking News

महायुतीच्या प्रचाराचा जोरदार धडाका

मतदारांच्या वाढत्या प्रतिसादाने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला

पनवेल : रामप्रहर वृत्त : शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार  खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत उरण, पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात महायुतीतर्फे प्रचाराचा जोरदार धडाका सुरू असून, त्या प्रचाराला मतदारांकडूनदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. गावागावात, वाड्यांवर उमेदवार बारणे यांचे जल्लोषात स्वागत केले जात असून, मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मतदारांना दिली जात आहे. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे हे कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक पुन्हा जिंकणारच, असा दावा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे पदाधिकारी या प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मतदारसंघात राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्ही मतदारांपुढे जात असून, खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा लोकसभेवर पाठविण्याचा निर्धारही महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.उन्हाचा कडाका असतानाही कार्यकर्ते मतदारांना घरोघरी भेटण्यावर भर देताना दिसत आहेत. त्यांना मतदारांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सर्वत्र आहे.

मनपा प्रभाग 17मध्ये प्रचारात महिला कार्यकर्त्यांचा सहभाग

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मनपा हद्दीतील प्रभाग 17मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीस महिला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीत नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगरसेविका सुशीला घरत, विजय म्हात्रे, जगदिश घरत, रावसाहेब खरात, राहुल वाहूळकर, सचिन तीर, अनिल साळवी, झरीना शेख, पप्पू साळवे, किशोर वाहूळकर, पैगंबर बागवान, आनंद पवार, अमोल लहाने, सतिश बोरूडे, विकास बोहोत, शांताराम कोळी, बाबू कोळी, मनीषा चिरले, लक्ष्मी चव्हाण, धनश्री वाघमारे, शैला आंबेकर, नंदा टापरे, अस्मा शेख, गुप्ता भाभी आदी सहभागी झाले होते.

खारघर प्रभाग 5मध्ये प्रचारात महायुती आघाडीवर

खारघर : मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आदेशानुसार तसेच सिडको अध्यक्ष, रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर प्रभाग 5 येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रचारावेळी मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा भारत देश घडविण्यास मतदारांनी पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे.

खारघर परिसरात महायुतीतर्फे प्रचार

पनवेल : वार्ताहर : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराने चांगलाच जोर धरला असून शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली  उपमहानगरप्रमुख गुरुनाथ पाटील व माजी शाखाप्रमुख गिरीश गुप्ता यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खारघर परिसर चांगलाच पिंजून काढला. प्रामुख्याने प्रत्येक घराघरात, आदिवासी वाड्यांवर महायुतीच्याच प्रचाराची चर्चा आहे.महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा चांगलीच जोरदारपणे राबविली आहे. मा. सरपंच व मा. उपमहानगरप्रमुख गुरुनाथ पाटील त्यांच्या सहकार्‍यांच्या साथीने अनेक आदिवासी वाड्यांत, ज्येष्ठ नागरिक, टॅक्सी स्टँड, रिक्षा स्टँड, टेम्पो स्टँड, इस्कॉन मंदिरासह इतर मंदिरे, आदिवासी वाड्यांत, त्याचप्रमाणे खारघर, कोपरा, मुर्बी भागातील हनुमान जयंती उत्सव, वाचनालये, ज्येष्ठ नागरिक कट्टे, विविध शाळा, भाजी व मच्छी मार्केट आदी परिसरात जाऊन प्रत्येक ठिकाणी उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले, तसेच त्यांच्या पत्रकांचे वाटप करून आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी देशात मोदी, तर मावळमध्ये महायुतीचे उमेदवार  बारणे हे पुन्हा एकदा प्रचंड मतांनी निवडून येणे गरजेचे असल्याचे त्यांनी पटवून दिले. त्यांच्या झंझावाती प्रचारामुळे खारघर परिसरात महायुतीला अनुकूल वातावऱण निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply