पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे पोलादपूर, महाड तालुक्यातील ज्या पूरग्रस्त, दरडग्रस्त भागात कमी प्रमाणात मदत पोहचली अशा भागांची माहिती घेऊन त्या गावांमध्ये जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, तसेच सध्या या ग्रामस्थांना भेडसावणार्या समस्या जाणून घेतल्या.
शासनाने ज्या कंटेनरमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. त्या कंटेनरमध्ये पाणी आणि शौचालयाची सोय नाही. तसेच मोठ्या कुटुंबांसाठी हे कंटेनर सोयीचे नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर पक्क्या घरांमध्ये शासनाने पुनर्वसन करावे, अशी त्यांची मागणी आहे.
या ग्रामस्थांच्या मागण्या, तसेच त्यांना भेडसावत असणार्या समस्या शासनापर्यंत पोहचवल्या जातील, असे आश्वासन या वेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी दिले.
या वेळी समितीचे सरचिटणीस विशाल मनोहर सावंत, कार्याध्यक्ष केवल महाडिक, प्रसिद्धीप्रमुख संतोष सुतार, सनीप कलोते, ओमकार महाडिक, दीपाली पारस्कर आदी उपस्थित होते.