Breaking News

आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागा; आमदार प्रशांत ठाकूर यांची कार्यकर्त्यांना सूचना

खोपोली ः प्रतिनिधी

आगामी पालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जनहिताची जी कामे केली आहेत, कल्याणकारी योजना राबविल्यात त्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवावी, असे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 5) सूचित केले. खोपोली येथील पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. भाजपच्या समर्थ बूथ अभियानाची आढावा बैठक लोहाणा समाज सभागृहात झाली. व्यासपीठावर अभियानाचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख अविनाश कोळी, कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख दीपक बेहरे, सहप्रमुख सनी यादव, भाजप खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, अ‍ॅड. राजेंद्र येरुणकर, महिला मोर्चा शहर अध्यक्ष शोभा काटे, हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, अजय इंगुळकर, स्नेहल सावंत आदी उपस्थित होते. या बैठकीत शहराच्या वेगवेगळ्या प्रभागातील गठीत झालेल्या बूथ कमिट्यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांनी आढावा घेताना शिल्लक राहिलेल्या बूथ कमिटीच्या याद्या लवकरात लवकर पूर्ण करून द्याव्यात, असे आदेश उपस्थित खालापूर तालुका, तसेच खोपोली मंडलाच्या पदाधिकार्‍यांना दिले. या वेळी उपस्थित पदाधिकार्‍यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी चर्चा केली. या वेळी या संदर्भात लवकरच विशेष बैठक बोलावली जाईल, असे आमदार ठाकूर यांनी स्पष्ट केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply