Breaking News

अभिमानास्पद! जी-20 गटाचे भारताकडे अध्यक्षपद

बाली : इंडोनेशियातील बाली येथे आयोजित जी-20 गटाच्या दोन दिवसीय शिखर परिषदेची बुधवारी (दि. 16) सांगता झाली. सदस्य देशांनी संयुक्त जाहीरनाम्याला अंतिम रूप दिल्यानंतर इंडोनेशियाकडून आगामी वर्षासाठी जी-20चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द करण्यात आले. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुढील वर्षाच्या जी-20 परिषदेचे अध्यक्षपद सोपविलेे. यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, या गटाचे अध्यक्षपद स्वीकारणे ही भारतातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब आहे. सर्व देशांच्या पाठिंब्याच्या जोरावर आम्ही जी-20 शिखर परिषद जागतिक कल्याणासाठी आदर्शवत बनवू.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply