Breaking News

गणपती बाप्पा मोरया..!

1800 गणेशभक्तांना घेऊन मोदी एक्स्प्रेस रवाना

मुंबई ः प्रतिनिधी
गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्‍या 1800 चाकरमान्यांना घेऊन मोदी एक्स्प्रेस मंगळवारी (दि. 7) मुंबईहून सावंतवाडीकडे रवाना झाली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप आमदार नितेश राणे यांनी दादर स्थानकावर या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनमधील प्रवाशांनी गणपतीची आरती म्हणत प्रवासाला सुरुवात केल्याचे व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच नितेश राणेंनी या ट्रेनसंदर्भात घोषणा केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून 225 ट्रेन आम्ही कोकणवासीयांसाठी सोडल्या आहेत. महाराष्ट्रात गणेशोत्सव अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. आता ही रेल्वे कोकणात जाणार आहेत. या रेल्वेमुळे कोकणवासी खूश आहेत, असे या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले.
आमदार नितेश राणे यांनी, दरवर्षी मी गणपतीच्या वेळी प्रवाशांसाठी बसेस सोडतो, पण या वर्षी आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणार आहोत. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन पंतप्रधान मोदींनी
कोकणाला आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्स्प्रेस सोडत आहोत, अशी माहिती दिली होती. मुंबई ते सावंतवाडी या प्रवासात मोदी एक्स्प्रेसमध्ये सर्व प्रवाशांना एक वेळचे जेवणदेखील दिले जाणार आहे.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply