पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी महिला मोर्चाच्या वतीने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन मंगळवारी (दि. 7) करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते झाले. या वेळी खांदा कॉलनी विभागातील विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या महिलांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
भाजप महिला मोर्चा खांदा कॉलनी शहर अध्यक्ष राखी पिंपळे व सहकारी महिलांनी ही मंगळागौर स्पर्धा आयोजित केली होती. चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धात्मक कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेविका सीता पाटील, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, तालुका सरचिटणीस प्रतिभा भोईर, माजी नगरसेविका नीता माळी, तालुकाउपाध्यक्ष समीना साठी, सुहासिनी केकाणे, प्रिया मुकादम, योगिता भगत, आशा मुंडे, मलिक्का शेट्टी, संध्या जाधव, शैला मोरे, सीमा निकम, मनीषा गोळे, वरिजा गुजारान, क्रांती शेट्टी, विनोदा शेट्टी, सोनाली सावंत, सुनिता चव्हाण, मनीषा पाटील, अरुणा खरात यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि स्पर्धक महिला उपस्थित होत्या.
या वेळी खांदा कॉलनी विभागीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी मनीषा पाटील, सचिवपदी क्रांती शेट्टी, सदस्य म्हणून विनोदा शेट्टी, वरिजा गुजरान, मनीषा गोळे, सीमा निकम यांनी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …