पनवेल : रामप्रहर वृत्त
सध्या बहुचर्चित असलेला न्हावा शिवडी प्रकल्प जो भविष्यात मुंबई अणि नवी मुंबई यांना जोडणारा दुवा ठरणार आहे. ज्यामुळे दळणवळण अधिक सुखकर होणार आहे. या प्रकल्पातील ब्रिजच्या कामामुळे मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ही बाब माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एमएमआरडीएसोबत बैठक घेऊन मार्गी लावली. त्यानुसार योग्य तो पाठपुरावा करून मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळवून दिली. याबद्दल गव्हाण ग्रामस्थांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आभार मानले.
या वेळी प्रमोद कोळी, काशिनाथ कोळी, विशाल कोळी, संजीव कोळी, राजकिरण कोळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. भविष्यातही आपण अशी बरीच कामे मार्गी लावू आणि यशस्वी करू, असे आश्वासन या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मच्छीमारांना दिले.
Check Also
भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …