Breaking News

पाकिस्तानी बोटीतून तटरक्षक दलाने केले 500 कोटींचे ड्रग्ज जप्त

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

तस्करविरोधी ऑपरेशनमध्ये भारतीय तटरक्षक दलाने मंगळवारी

(दि. 21) गुजरातच्या जाखाऊ किनार्‍याजवळ अमली पदार्थाने भरलेली एक पाकिस्तानी बोट पकडली. ‘अल मदीना’ असे या बोटीचे नाव आहे. या बोटीत अमली पदार्थांची 194 पाकिटे सापडली असून, त्याची किंमत 500 कोटी रुपयांच्या घरात आहे. हे अमली पदार्थ जाखाऊच्या किनार्‍यावर पोहचवण्यासाठी पाकिस्तानी बोट आंतरराष्ट्रीय समुद्र सीमेजवळ थांबली होती. ही बोट पकडण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने एक जहाज व दोन वेगवान इंटरसेप्टर बोटी पाठवल्या. गुप्तचरांच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. समुद्र खवळलेला असतानाही तटरक्षक दलाच्या बोटींनी पाठलाग करून पाकिस्तानी बोट पकडली.

या वेळी अल मदीनावरून काही संशयास्पद बॅगा समुद्रात टाकण्यात आल्या. तटरक्षक दलाने पाक बोटीवरील सदस्यांना ताब्यात घेतले व पाण्यातून सात बॅगा बाहेर काढल्या. अमली पदार्थ शोधणार्‍या किटच्या मदतीने पॅकेटच्या तपासणीत त्यात अमली पदार्थ आढळून आले.

Check Also

चित्रपट प्रसिद्धीचा वाढता विळखा

पोस्टर ते डिजिटल स्थळ : दादरमधील एक मध्यवर्ती भागातील हॉल, निमित्त : घरत गणपती या …

Leave a Reply