Breaking News

विसर्जन घाटाच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण

गणेशभक्तांनी मानले तेजस कांडपिळेंचे आभार

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिकेच्या प्रभाग 20मधील पोदीवरील गणेश विसर्जन घाटावर शनिवारी (दि. 11) दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात आले. या वेळी तेथील तुटलेल्या घाटाचे आणि खराब झालेल्या रस्त्याचे काम पूर्ण करून घेतल्याबद्दल गणेशभक्तांनी नगरसेवक तेजस कांडपिळे यांचे भेटून

आभार मानले.

पनवेल महापालिकेच्या प्रभाग 20 मधील पोदीवरील गणेश विसर्जन घाटाची आणि रस्त्याची पावसामुळे दैनावस्था झाली होती. रस्त्यावर चिखल झाला होता. त्यामुळे तेथून गणेशमूर्ती घेऊन जाणे अवघड होते. नागरिकांच्यात त्याबाबत असंतोष निर्माण होत असल्याने प्रभाग 20चे नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याजवळ चर्चा करून याबाबत महापालिका आयुक्तांना 20 ऑगस्ट रोजी पत्र देऊन रस्त्याचे काँक्रीटीकरण किंवा पेव्हर बॉक्स बसवण्याची मागणी सोबत तेथील रस्त्याची दुर्दशा दाखवणारा फोटो देऊन केली होती.

महापालिका आयुक्तांनी त्याची दखल घेऊन तातडीने पोदी विसर्जन घाटाकडे जाणार्‍या रस्त्यावर काँक्रीटीकरण केले. त्यामुळे पोदी गावातील नागरिकांना त्या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी सुखरूप जाता आले. त्यामुळे शनिवारी संध्याकाळी तेथे येणारा गणेशभक्त नगरसेवक तेजस कांडपिळे यांचे भेटून आभार मानत होता.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply