Breaking News

सिडको करणार खारघर, तळोजामध्ये पाणीपुरवठा

भाजपच्या पाठपुराव्याला यश

नवी मुंबई: प्रतिनिधी

खारघर आणि तळोजा परिसरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे सिडकोने पाणीपुरवठा करण्यासाठी एक कोटी 41 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. यासंदर्भात  भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांनी सिडकोला धारेवर धरले होते. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करून सिडकोसोबत बैठक घेतली होती.

खारघर आणि तळोजा परिसरात गेल्या काही वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांनी सिडकोकडे लेखी तक्रार केली होती. आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर, तसेच भाजप नगरसेवकांनी अधिकार्‍यांना भेटून पाणी समस्या गंभीर होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तर काही रहिवाशांनी पाणी प्रश्नावर आंदोलने केली होती. पाणीपुरवठा समस्यांबाबत तसेच भविष्यकालीन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सूचित केल्याप्रमाणे सिडकोने दखल घेऊन सहव्यवस्थापकीय संचालक कैलाश शिंदे यांनी खारघरमधील ज्या भागातील सोसायटीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अशा सोसायटीत टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनानुसार खारघर आणि तळोजा येथील आकस्मिक निकड लक्षात घेत पिण्याचा भाड्याने पुरवठा करणार्‍या वॉटर टँकरसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. खारघर आणि तळोजासाठी 365 दिवस पाणीपुरवठा केला जाणार असून यासाठी सिडको एक कोटी 41 लाख 62 हजार रुपये खर्च करणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply