Breaking News

कुष्ठरुग्ण, दिव्यांगांसाठी लसीकरण मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आणि नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांच्या पुढाकाराने कुष्ठरुग्ण आणि दिव्यांगांसाठी विषेश लसीकरण मोहीम सोमवारी (दि. 13) राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत झाला. महानगरपालिका आणि भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून कोरोना महामारीचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांच्या पाठपुराव्यामुळे पनवेल बस स्टँडजवळील इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये कुष्ठरुग्ण आणि दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या लसीकरण मोहिमेमध्ये कोव्हीशिल्ड या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले. या वेळी प्रभाग समिती ‘ड’ सभापती सुशीला घरत, नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे, कुष्ठरोग महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष श्री. भोपाळ, वैद्यकीय अधिकारी आनंद गोसावी, डॉ. रेहाना मुजावर, डॉ. चांडक मॅडम, अ‍ॅडव्होकेट जितेंद्र वाघमारे, दिव्यांग्यांचे पनवेल अध्यक्ष श्री. कांबळे, झोपडपट्टी अध्यक्ष श्री. मंजुळे, अशोक आंबेकर, इच्छापूर्ती गणेशमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आशोक कांबळे, रावसाहेब खरात, राहुल वाहुळकर, आनंद गुरव, नंदा टापरे, शैला आंबेकर, तसेच कुष्ठरुग्ण, दिव्यांग उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोरोना महामारीच्या काळात सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, तसेच इतरांनाही याबाबत जागृत करावे. कोरोना महामारीच्या या संकट काळात समाजातील गरजवंतांना मदत करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply