Breaking News

वडखळ-धरमतर रस्त्याची पोलिसांकडून डागडुजी

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलिबाग मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने रस्ता चिखलमय झाला होता. वडखळ पोलिसांकडून अलिबाग-धरमतर रस्त्यावरील खड्डे भरून तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी चाकरमानी आणि गणेशभक्तांची लगबग सुरू आहे, मात्र मुसळधार पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडल्याने त्यांच्या प्रवासात विघ्न येत आहे. वाहतूकदारांनाही त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाचे मात्र रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिक, तसेच वाहनचालकांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, वडखळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅक्टर, जेसीबीच्या सहाय्याने अलिबाग-धरमतर रस्त्याची डागडुजी करण्यात आली. या वेळी पोलीस उपनिरीक्षक भोर, सहाय्यक फौजदार पाटील, पोलीस नाईक अमोल म्हात्रे, पोलीस नाईक दिनेश भोईर उपस्थित होते.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply