Breaking News

बँक ऑफ इंडियातर्फे हिंदी दिवस

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

बँक ऑफ इंडिया, प्रशिक्षण संस्थान, नवी मुंबई, येथे दरवर्षी प्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. प्रशिक्षण संस्थानमध्ये स्टाफ सदस्यांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला. प्रशिक्षण संस्थानाचे प्राचार्य विवेक प्रभु व समस्त कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत गृहमंत्री अमित शाह तथा बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. के. दास यांच्या संदेशांचे वाचन करण्यात आले.

या प्रसंगी कार्यालयीन कामकाजात जास्तीत जास्त हिंदी भाषेचा वापर करण्यात राजभाषा प्रतिज्ञा प्राचार्य विवेक प्रभु व सर्व कर्मचार्‍यांनी केली. विवेक प्रभु यांनी यांनी भाषणामध्ये जास्तीत जास्त हिंदी भाषेचा वापर करून सर्वांनी राष्ट्र्निर्माणमध्ये सहभागी व्होण्याचे आवाहन केले.

हिंदी महिन्यामध्ये हिंदी सुलेख, हिंदी टंकलेखन, बँकिंग शब्दावली, आंतरिक कामकाज में हिंदी, आणि ऑनलाइन बँकिंग व राजभाषा ज्ञान या स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या स्पर्धकांना या वेळी पुरस्कार व प्रमाणप्रत्र देऊन सन्माानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार मुख्य व्यवस्थापक (राजभाषा) रमेश साखरे गच्छी यांनी केले. त्यानंतर आयोजित हिंदी महिना आणि हिंदी दिवसची समाप्ती घोषित करण्यात आली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply