Wednesday , February 8 2023
Breaking News

जेएनपीटीमध्ये ड्वार्फ कंटेनर ट्रेनला हिरवा झेंडा

उरण : वार्ताहर

केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जेएनपीटी येथे ड्वार्फ कंटेनर ट्रेनला आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून ड्वार्फ (कमी उंचीचे) कंटेनर ट्रेन सेवेचा आरंभ केला. या वेळी नौकायन व जलमार्ग मंत्रालय (बंदरे) सचिव डॉ. संजीव रंजन, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेश शरद वाघ उपस्थित होते. मंत्री महोदयांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर बंदरातील ड्वार्फ कंटेनर डेपो (डीसीडी) मधून ड्वार्फ कंटेनरची पहिली खेप ड्वार्फ कंटेनर ट्रेनद्वारा आयसीडी कानपूरला रवाना झाली.

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, ड्वार्फ कंटेनर हे पोर्ट-फ्रेंडली असून आणि ते किफायतशीर किंमतीत भारतात तयार केले जाऊ शकतात ज्यामुळे ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत नवीन संधी खुल्या होतील. या सेवेमुळे मालाची निर्यात अधिक स्पर्धात्मक दराने होईल आणि भारतातून निर्यातीमध्ये वाढ होईल. एक सशक्त लॉजिस्टिक क्षेत्र विकसित झाल्यास उत्पादन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण देश बनण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होईल, तसेच मेक इन इंडियाला सुद्धा प्रोत्साहन मिळू शकेल.

जेएनपीटी बंदरात ही सेवा सुरू झाल्याने जेएनपीटीमध्ये व्यवसाय वृद्धी होण्यास, प्रवेशद्वार व रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास देखील मदत होणार आहे; डीपीडी सेवेमध्ये वाढ होईल ज्यामुळे वाहतूकदारांचा वाहतूक खर्च आणखी कमी होईल, शिपिंग कंपन्यांच्या कंटेनरचा टर्नअराउंड वेळ कमी होण्याबरोबरच कंटेनरच्या कमतरतेच्या समस्यांचे देखील निराकरण होण्यास मदत होईल.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply