Breaking News

खोपोलीतील कृत्रिम तलावात 268 गणपतीचे विसर्जन

खोपोली : प्रतिनिधी

येथील रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, रोटरॅक्ट क्लब आणि खोपोली नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांत शहरातील 268 गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी खोपोली शहरातील नेहरू गार्डन, लक्ष्मी नगर गार्डन व शिळफाटा येथे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. शिवाय तीन टेम्पो नगर परिषदेच्या विविध विभागात फिरवण्यात आले होते. रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, रोटरॅक्ट क्लब आणि नगर परिषदेने उभारलेल्या या कृत्रिम तलावांत दीड दिवसांचे 102, पाच दिवसांचे 125 आणि 10 दिवसांचे 41 अशा एकूण 268 गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले.

रोटरी क्लब प्रेसिडेंट सुरेश खेडकर, सेक्रेटरी सुरेंद्र जोशी, माजी अध्यक्ष संजय पाटील, इनरव्हील क्लब अध्यक्षा सुचिता जोशी, रोटरॅक्ट क्लब अध्यक्ष शिवम महाबारे, सचिव श्रुती विध्वंस, सहसचिव विनय पटेल, समाजसेवा संचालक मिहीर भुटाला यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी व अधिकार्‍यांनी या उपक्रमाला सहकार्य केले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply