Breaking News

राष्ट्रवादीचे विशाल म्हात्रे सहकार्‍यांसह भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवे नोडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उलवे नोड अध्यक्ष विशाल म्हात्रे यांनी आपल्या सहकार्‍यांसह भारतीय जनता पक्षामध्ये गुरुवारी (दि. 23) जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल घालून पक्षात स्वागत केले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, भारतीय जनता पक्ष आणि आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे तुमच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु, असे आश्वासन प्रवेशकर्त्यांना दिले.
भारतीय जनता पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उलवे नोड अध्यक्ष विशाल म्हात्रे, परेश मोकल, हसन मिया, रीयान लेवीस, नसरुद्दीन मुल्ला, महेश दिवाकर, अजहर शेख, मंगेश ठाकूर, जयवंत घरत, गौरव म्हात्रे, सरोज त्रिपाठी, मंगेश पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी विशाल म्हात्रे यांची भारतीय जनता पार्टी उलवे नोड उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, भाजप नेते वैभव ठाकूर, नामदेव ठाकूर, अंकुश ठाकूर, नंदकुमार ठाकूर, प्रवीण ठाकूर, हरिदास घरत, युवा मोर्चा उलवे नोड अध्यक्ष निलेश खारकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply