Monday , February 6 2023

क्रिकेट दौरे रद्द झाल्याने इम्रान खान खवळले

इस्लामाबाद : वृत्तसंस्था

न्यूझीलंड आणि इंग्लंडने पाकिस्तान दौरा रद्द केल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान स्तब्ध झाले आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने दौरा रद्द केल्याने संपूर्ण जगात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. त्यामुळे इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाला आगामी टी -20 विश्वचषकात भारताविरुद्ध निर्भयपणे वाघासारखे खेळण्याचा सल्ला दिला आहे. दौरा रद्द केल्यामुळे इम्रान खान यांनी स्वत: न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना फोन करून सुरक्षेचे आश्वासन दिले होते, पण जॅसिंडा अर्डर्न यांनीही पाकिस्तानी पंतप्रधानांकडे दुर्लक्ष केले. यानंतर इम्रान खान पाकिस्तानी संघाची भेट घेत अपमानाचा बदला घ्या, असे आवाहन केले आहे. ‘आपने घबराना नहीं’ असे म्हणत त्यांनी खेळाडूंना आधार दिला.

एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान यांनी पाकिस्तानी खेळाडूंना टी-20 विश्वचषकात चांगले खेळून न्यूझीलंड आणि इंग्लंड दौरा रद्द केल्याचा बदला घेण्यास सांगितले. दरम्यान, न्यूझीलंड आणि इंग्लंडने दौरे रद्द केल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंचा आत्मविश्वास कमी झाला आहे. त्यामुळे इम्रान खान यांनी संघाला भेटून त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे. या बैठकीनंतर पाकिस्तानी सिनेटर फैसल जावेद म्हणाले की, पंतप्रधानांनी खेळाडूंना भारताविरुद्ध निर्भयपणे क्रिकेट खेळण्यास सांगितले.

Check Also

सर्वांच्या सहकार्याने शाळेची प्रगती शक्य -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त गावकरी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि संस्था या सर्वांचा सहयोग असला, तर …

Leave a Reply