कडाव : प्रतिनिधी : श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पाथरज जिल्हा परिषद वार्डमधील कशेळे, बोरिवली, वारे, पाथरज, ठेंभरे, मोग्रज, सावळा हेदवली, मांडावणे, भिवपुरी, हुमगाव आणि वैजनाथ ग्रामपंचायतीमधील गावांत महायुतीचे कार्यकर्ते घरोघरी जावून, मतदारांबरोबर संवाद साधत आहेत. मतदारही त्यांचे स्वागत करीत आहेत. या जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठे पाठबळ मिळत आहे.
पाथरज जिल्हा परिषद गटामधील महायुतीच्या प्रचारात भाजपचे कर्जत तालुका सरचिटणीस राजाराम शेळके, युवा मोर्चाचे दिनेश रसाळ, नीलेश पिंपरकर, ज्येष्ठ नेते रमेश मते, संदेश सावंत, ज्ञानेश्वर भालिवडे, भगवान घुडे, बाजीराव दळवी, विनायक पवार, रामचंद्र मिणमिणे, दीपक भोईर, स्वप्नील मते, संतोष घुडे, विलास थोरवे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ते युती सरकारच्या विकासकामांची व योजनांची माहिती मतदारांना देत आहेत. मतदारही या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
पाथरज जिल्हा परिषद गटात श्रीरंग बारणे यांचे पारडे जड असून महायुतीचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा मावळमध्ये शिवसेना भाजप युतीच विजयी होईल.
-दिलीप ताम्हाणे, उपतालुकाप्रमुख, शिवसेना, कर्जत