खालापूर : प्रतिनिधी
सेवा व समर्पण अभियानाचे औचित्य साधून खालापूर शहर भाजप, बोन्साय स्टडी ग्रुप ऑफ द इंडो जापनीज असोसिएशन आणि फ्रँजिपानी गार्डन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच निंबोडे दांडवाडी (ता. खालापूर) ग्रामस्थांच्या माध्यमातून रविवारी (दि. 26) निंबोडे व दांडवाडी परिसरात 150 झाडांची लागवड करण्यात आली. या वेळी निंबोडे दांडवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. निंबोडे व दांडवाडी परिसरात लागवड केलेल्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ व बोन्साय स्टडी ग्रुप ऑफ द इंडो जापनीज असोसिएशन व फ्रँजिपानी गार्डन ग्रुप यांनी घेतली आहे. भाजपचे खालापूर शहर अध्यक्ष राकेश गव्हाणकर, विजय शिंदे, माजी नगराध्यक्ष दीपक नाईक, मनोज मिसाळ, हेमचंद्र पारंगे, लक्ष्मण जाधव, योगेश जाधव, मधुकर पाटील, नाथा पवार, भालचंद्र मिसाळ, गणेश मिसाळ, देवेंद्र मिसाळ, सुरेश वाघमारे, अनंता वाघमारे, शर्मिला मिसाळ, ज्योती पारेख यांच्यासह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.