Breaking News

दैनिक बित्तंबातमीच्या रायगड आवृत्तीचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त

स्वातंत्र्यकाळापासून वृत्तपत्रांनी मोठी चळवळ चालवली असून समाजामध्ये या वृत्तपत्रांनी विश्वासार्हता निर्माण केली. त्यापैकीच बित्तंबातमी हे वृत्तपत्र आहे, असे गौरवोद्गार उरणचे आमदार महेश बालदी यांनी येथे काढले. आज समाजमाध्यमांचा कितीही प्रभाव असला तरी वृत्तपत्राचे महत्त्व कमी झाले नाही, असे मत पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी व्यक्त करून बित्तंबातमीला शुभेच्छा दिल्या. बित्तंबातमीच्या रायगड आवृत्तीच्या प्रथम अंकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मान्यवर बोलत होते. या वेळी बोलताना आमदार बालदी म्हणाले की, आजच्या परिस्थितीत वृत्तपत्र काढणे व ते चालवणे किती कठीण काम आहे, पण संपादक अनिकेत जोशी यांनी ते आव्हान गेल्या 35 वर्षांपासून लीलया पेलले आहे. वृत्तपत्राला वाचक निर्माण करणे हेही आजच्या काळात अवघड असल्याचे सांगून लोकशाहीचा खरा आधार वृत्तपत्रच आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.पनवेल येथील रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाच्या सभागृहात शुक्रवारी (दि. 17) सायंकाळी बित्तंबातमीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी संपादक अनिकेत जोशी यांनी रायगड आवृत्ती सुरू करण्यामागची आपली भूमिका आपल्या प्रास्ताविकातून मांडली, तर दैनिक रामप्रहर वृत्तपत्राचे संपादक देवदास मटाले यांनी वृत्तपत्राचे महत्त्व विषद करून बित्तंबातमीला शुभेच्छा दिल्या. या वेळी बित्तंबातमीचे मुख्य वितरक अरविंद दातार यांचा प्रमुख पाहुणे आमदार महेश बालदी व महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या समारंभाचे सुरेख संचालन ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे यांनी केले, तर रायगड आवृत्तीचे प्रमुख अशोक गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply